ज्योतिष (अ‍ॅस्ट्रॉलॉजी), कृष्णमूर्ती (केपी) ज्योतिष, अंकशास्त्र (न्यूमेरॉलॉजी), राशीभविष्य, शुभ मुहूर्त, टॅरो कार्ड रिडींग आणि वास्तूशास्त्र इ.संबंधी वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा. ईमेल : (vedicjyotishmail@gmail.com) धन्यवाद ! ||शुभम भवतु||

लग्न जमत नाही, लग्नाला उशीर होतो, ठरलेलं लग्न मोडतं. असं का होतं? यावर उपाय काय?


विवाहासाठी ज्योतिष उपाय
लग्न हा आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे. ते नेमकं कधी करावं यावर अनेकांची अनेक मते असतात. "लवकर करावं म्हणजे सगळं काही वेळच्या वेळी होतं", इथपासून, "आयुष्यात आधी सेटल होऊ दे, स्वतःच घर घेऊ दे, आणि मग बघू" इथपर्यंत.

ज्यांना इतक्यात लग्न करायचं नाही त्यांना भरमसाठ स्थळं चालून येतात, आणि जे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत त्यांना चांगलं स्थळच मिळत नाही. काही वेळा तर सगळं काही ठरल्याप्रमाणे सुरळीत चालू असतानादेखील शेवटच्या क्षणी लग्न मोडतं. असं का होतं?
चला बघूया...


जन्मकुंडलीमध्ये ७ वे स्थान हे लग्नाचं/जोडीदाराचं स्थान आहे. पुरुषांच्या पत्रिकेत शुक्र हा वधू(नवरी) दर्शवतो, तर महिलांच्या पत्रिकेत गुरू वर(नवरा) दर्शवतो. पत्रिका जर व्यवस्थित असेल म्हणजे सातवं स्थान शुभ आणि हे दोन्ही ग्रह चांगल्या योगात असतील, तर लग्नाचा योग लवकर येतो आणि सुखाचा संसार होतो.

जेव्हा लग्नाला उशीर होतो, तेव्हा शुक्र, गुरू, शनि आणि मंगळ हे ग्रह बघतात. गुरु व शुक्र वक्री असतील, सातव्या घरात शनि असेल वा सातव्या घराशी शनिचा घनिष्ठ संबंध असेल तर लग्नाला उशीर होतो आणि खूप अडचणी येतात. कारण शनि विलंबाचा कारक आहे. तो जिथे असेल तिथे ते काम करायला उशीर करतो.

मंगळ जर सातव्या घरात असेल किंवा त्याची त्या स्थानावर दृष्टी असेल तर अशा माणसाने वयाची २८ वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न करू नये. केल्यास जोडीदाराबरोबर पटत नाही, खूप भांडणं, वाद-विवाद होतात.

सूर्य जर सातव्या घरात असेल किंवा त्याची त्या स्थानावर दृष्टी असेल तर अहंकारी व गर्विष्ठ स्वभावामुळे लग्न जमत नाही. "माझ्या अपेक्षा", "आमच्याकडे अशी पद्धत आहे", "लग्नात मध्ये मी हेच घालणार, असंच वागणार" , "माझं लग्न आहे, माझं आयुष्य आहे, मी, मी आणि मी", "मी म्हणेन तीच पूर्व दिशा", असा स्वभाव असतो. म्हणून लग्नाची बोलणी चालू असताना बर्‍याच वेळी या कारणामुळे लग्न मोडतात.

केतू जर असेल तर तो वैराग्य निर्माण करतो. "कशाला उगाच लग्न वगैरे करा, मग बायको/नवरा डोक्याशी कटकट करणार", "मग मुलांची कटकट, त्यांची शाळा, आरडाओरडा, तेच ते कंटाळवाणे प्रकार, त्यापेक्षा नकोच ते, मी एकटाच बरा, स्वातंत्रप्रिय, वगैरे" हे असले विचार केतू देतो. म्हणून लग्नाला उशीर होतो.

राहू म्हणजे भिरभिरल्यासारखं होतं माणसाला. काय करू अन् काय नको, असं होतं. कुणाचंही ऐकायचं नाही. लग्न करून वर परत एखादं प्रेमप्रकरण पण करू का? का आणखी एक लग्न करून लपवून ठेवू? असे विचार येतात. घाईघाईत लग्न करायचं, मग नंतर पश्चाताप करायचा, मग पुन्हा तसंच घाईघाईत दुसरं लग्न करायचं, पुन्हा पश्चाताप, आणि मग हे चालूच. म्हणून लग्न जमत नाही, जमलं तर टिकत नाही. टिकलं तर आहे त्या जोडीदाराबरोबर सुसंवाद नसतो, सगळं लक्ष बाहेर.

तर असे अनेक प्रकारचे ग्रह, योग व ग्रहाच्या दृष्टी, त्यांची भ्रमणं वगैरे या सगळ्याचा अभ्यास करून मग ठरवावं लागतं कि नेमक्या कुठल्या दोषामुळे लग्नाला उशीर होतो आहे. आणि मग त्या दोषावर उपाय करून ते दोष मिटवावे लागतात आणि मग लग्न जमतं.

खूप प्रयत्न करून सुद्धा तुमचं जर लग्न जमत नसेल, किंवा जमलेलं मोडत असेल किंवा मनासारखं स्थळ चालून यावं असं वाटत असेल, तर आम्हाला नक्की संपर्क करा. आम्ही तुम्हाला योग्य उपाय सुचवू जेणेकरून तुमचं लग्न लवकरात लवकर जमेल आणि सुखाचा संसार सुरू होईल.

आम्ही लग्नाच्या केसेससाठी "अ‍ॅस्ट्रॉलॉजी हिलिंग" हि आधुनिक व पारंपारिकतेचं मिश्रण असलेली पद्धत वापरतो. त्याचे रिझल्ट्स खूप छान आहेत आणि मुख्य म्हणजे दिलेल्या वेळेत काम होतं.

अधिक माहितीसाठी इथे संपर्क करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा